आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत ट्रॅक्टर आणि क्रूझरचा भीषण अपघात; 6 पैलवानांचा मृत्यू, सहा जणांची प्रकृती गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- सांगली जिल्‍ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझरच्‍या धडकेत सहा पैलवानांचा मुत्‍यू झाला आहे, तर सहा पैलवानांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतत असताना शुक्रवारी रात्री 12 वाजेच्‍या सुमारास हा अपघात घडला.


सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे  10 ते 12 पैलवान साताऱ्याहून कुस्ती खेळून क्रूझरने परतत होते. त्यावेळी ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जखमींना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...