आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात आश्रमशाळेत झोपेच्या जागेसाठी 2 विद्यार्थ्यांमध्ये मारामारी; एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- राजपुतवाडी (ता.करवीर) येथील निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये रात्री झोपेच्या जागेवरुन हाणामारी झाली. एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या छातीत ठोसे मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शंकर सावळाराम मोरे (वय 16 वर्षे, रा.अंबाई वाडा, ता.शाहूवाडी ) असे आहे. याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, राजपुतवाडी या गावात भटका व विमुक्त समाज विकास मंडळ संचलित माध्यमिक आश्रमशाळेत विविध ठिकाणची मुले शिकण्यासाठी वास्तव्यास आहेत. त्या विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी विविध खोल्या देण्यात आल्या आहेत. यापैकी एका खोलीत झोपण्याच्या जागेवरून दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दुसऱ्या विद्यार्थ्याने छातीत ठोसे मारल्याने शंकर बेशुद्ध पडला. आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्याला तात्काळ येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शंकरचा मृत्यू झाला. शंकर गेल्या दोन वर्षांपासून या आश्रमशाळेत रहात होता. करवीर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...