आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभाजी भिडे यांच्या संरक्षणातील पाच पोलिस निलंबित, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/सांगली- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पाच पोलिसांचे शुक्रवारी रात्री निलंबन करण्यात आले आहे. भिडे पुण्याला गेले तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी पाच पोलिस तैनात करण्यात आले होते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत.


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे हे आरोपी आहेत. भीमा कोरेगावमधील हिंसाचारानंतर तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप सावंत यांनी भिडे यांना पोलिस संरक्षण दिले होते. भिडे यांच्या सुरक्षेची जबाबदारी असताना काही दिवसांपूर्वी हे कर्मचारी परस्पर दुसरीकडे गेले होते. भिडे यांच्या त्या दिवसाची माहिती देखील या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला कळवली नव्हती. भिडे पुणे येथे गेले तेव्हा, त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी एकही पोलिस कर्मचारी नव्हता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...