आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर- कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनस रेल्वे स्थानकामध्ये मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कोल्हापूर रेल्वेस्थानकात वायफाय सेवेचा शुभारंभ झाला. दुसर्या टप्प्यात मध्यवर्ती बस स्थानक आणि श्री अंबाबाई मंदिर परिसर तसेच काही महाविद्यालयात वायफाय सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर शहरात किमान पाच ठिकाणी मोफत वायफाय सुविधा सुरू करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली होती. या मागणीला आता मुर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकात वायफाय सुविधेचं उद्घाटन, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्टेशन प्रबंधक विजय कुमार, रेल्वे बोर्डाचे सदस्य समीर शेठ, शिवनाथ बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. रेल्वे मंत्रालयातर्ंगत असलेल्या, रेनटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला रेल्वे स्थानक वायफाय करण्याचं काम सोपवले आहे.
आतापर्यंत भारतातील 200 रेल्वे स्थानकांमध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात आली असून, आजपासून कोल्हापूर आणि मिरज रेल्वे स्थानकात वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर 16 ऍक्सेस पॉईंट द्वारा वायफाय सुविधा सुरू झाली असून, ७० मीटरच्या परिसरात ही सेवा मिळणार आहे. 30 एमबीपीएस स्पीडची ही सेवा असून, सध्या तरी अनलिमिटेड कनेक्शनला ही सेवा मिळणार आहे. रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर मोबाईल हँडसेट मध्ये रेल वायर वायफायवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर चार अंकी कोड मिळणार असून, तो डायल केल्यानंतर, मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. या सेवेमुळं कोल्हापूरच्या पर्यटनात वाढ होईल, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. तसेच दुसर्या टप्प्यात श्री अंबाबाई परिसर आणि काही कॉलेज मध्ये ही सेवा सुरू होईल असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
रविवारी 21 जानेवारी रोजी रेल्वेचे सरव्यवस्थापक कोल्हापुरात येणार आहेत. त्या अनुषंगाने भागीरथी महिला संस्था आणि कोल्हापूर ग्रीन या संस्थांमार्फत रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणासाठी 300 वृक्ष भेट देण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाचा लुक बदलणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी मोहन शेटे, अवनिश शहा, सुधीर देवधर, रेनटेल कार्पोरेशनचे राहूल माने, इलियास शेख, रोहित निर्वाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.