आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढी विरोधात कोल्‍हापुरात कॉग्रेसचा बैलगाडी मोर्चा;जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर– इंधनदरवाढी विरोधात आज कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आज भव्य बैलगाडी मोर्चा काढून केंद्र आणि राज्यशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रसरकारच्या तसेच राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देवून कॉग्रेस कार्यकर्तांनी आसमंत दुमदुमून सोडला. या मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना  मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले.


मंगळवारी दुपारी 1 वाजेच्‍या सुमारास ऐतिहासिक दसरा चौकात जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरवात झाली. यावेळी कॉग्रेस कार्यकर्तांनी गर्दी केली होती.  मोर्चात आनलेल्‍या बैलगाड्यावर राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनाचे फलक लावून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला होता. दसरा चौकातून व्हीनसकॉर्नर मार्गे हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.


याठिकाणी माजी मंत्री आणि माजी खासदार जयवंतराव आवळे, सुरेश कुराडे आणि जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांची भाषणे झाली. यानंतर जिल्हाधिकारी सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.पेट्रोल आणि डीझेल दरवाढ कमी झाली नाही तर जिल्हा आणि शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


या मोर्चामध्ये शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,महापौर स्वाती यवलुजे,माजी मंत्री आणि माजी खासदार जयवंतराव आवळे,सुरेश कुराडे,माजी आमदार दिनकर जाधव,उदय पाटील कौलवकर,तौफिक मुल्लाणी,सचिन चव्हाण,दुर्वास कदम,कॉंग्रेस महिला राज्य उपाध्यक्ष सरलाताई पाटील, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर,शहराध्यक्ष संध्या घोटणे,दीपा पाटील,रुपाली पाटील,चंदा बेले,वैशाली महाडिक आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...