आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हज यात्रेला राज्यातून 12 हजार तर देशभरातून सव्वा लाख यात्रेकरू जाणार- इम्तियाज काझी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- यावर्षी हज यात्रेला राज्यातून 12 हजार तर देशभरातून सव्वा लाख यात्रेकरू जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष अधिकारी इम्तियाज काझी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा नियोजन केंद्र आणि राज्य हज समितीकडून सुरू आहे. अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयांतर्गत हज कमिटी ऑफ इंडिया ही सर्वोच्च संस्था या यात्रेचं संपूर्ण नियोजन करते. महाराष्ट्र राज्याची हज कमिटी ही महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी नियोजन करत असते. यामध्ये यात्रेकरूंची नोंदणी करणे त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे त्याचबरोबर सौदी अरेबिया इथे यात्रेकरूंना राहण्यास सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षी 70 वर्षावरील हज यात्रेकरूंसाठी कोणत्याही प्रकारची सोडत असणार नाही अशीही  माहिती काझी यांनी यावेळी दिली. 


कोल्हापुरात यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यानंतर पत्रकारांशी बोलताना काझी यांनी सांगितले, महाराष्ट्रात हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मुंबई ,औरंगाबाद आणि नागपूर येथे केंद्र बनवले आहेत. कोल्हापुरातील हज यात्रेकरू हे मुंबई केंद्रामार्फत हजला जातील. या सेंटरकडे नोंद झालेल्या यात्रेकरूंना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ह्यासाठी पहिल्यांदा जाणाऱ्या यात्रेकरूला कोणताही कर सौदी अरेबिया सरकारला द्यावा लागत नाही. पण आधी ही यात्रा जर करुन आला असाल तर सौदी अरेबिया सरकारला दोन हजार रियान इतका कर भरावा लागणार आहे. हज यात्रेला जाण्यासाठी सरकारने सबसिडी जरी बंद केली असली तरी मुंबई केंद्राच्यावतीने जाणाऱ्या यात्रेकरूंना एकोणसाठ हजार दोनशे रुपये इतके विमान भाडे आकारले जाणार आहे. पर्यायाने कोल्हापुरातील यात्रेकरू मुंबई केंद्राकडून जात असल्यामुळे त्यांना सर्वात कमी विमान भाडे आकारले जाणार आहे, असेही काझी यांनी सांगितले.

 

सागरी मार्गाने हज यात्रेसाठी प्रयत्नशील

1992 पूर्वी हज यात्रेला जाणाऱ्यांची संख्या मोठी होती यामुळे सागरी मार्गाने हज यात्रा करता येत होती पण 1992 पासून सागरी मार्गाने हज यात्रा बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तसेच जर महिलांना हज यात्रेला जायचे असेल तर चार जणांच्या समूह करून या महिला मेहरम शिवाय हज यात्रा करु शकतात हाही निर्णय यावर्षी नवीन करण्यात आला. हज यात्रेकरूंना आपले ओळखपत्र जवळ ठेवावे तसेच सुरक्षिततेच्या बाबतीत स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे असे आव्हानही काझी यांनी यावेळी केले. हज यात्रेला जाण्याची संधी मिळालेल्या सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घेतला. यावेळी राज्य हज कमिटीचे खजानिस जुबेर अहमद, अब्बास शेख ,कोल्हापूर कमिटीचे जिल्हा समन्वयक हाजी इकबाल देसाई ,हज फौंडेशनचे खजानिस हाजी बाबासाहेब शेख, मुस्लिम बोर्डिंगचे संचालक जहांगीर आत्तार, यांच्यासह सर्व यात्रेकरू व कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...