आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हापुरात ACB ची मोठी कारवाई; IRB अाॅफिसमध्ये 40 हजारांची लाच घेताना 6 जणांना रंगेहात पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- भारत राखीव बटालियन मधील खेळाडू कर्मचाऱ्यांच्याकडून बंदोबस्तावर न पाठवण्यासाठी तसेच अन्य त्रास न देण्यासाठी चक्क 40 हजार रूपयांची लाच घेणारे सहायक समादेशक आणि त्याच्यासोबत पोलीस निरीक्षक अशा अन्य सहा जणांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

याबाबत याच भारत राखीव बटालियनमध्ये सहायक फौजदार म्हणून कार्यरत असणाऱ्या एका खेळाडूने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार भारत राखीव बटालियनचे सहायक समादेशक (पोलीस उपअधीक्षक) मनोहर नारायण गवळी (58) रा.शिवाजी चौक, टेंबलाईवाडी कोल्हापूर ( मूळ गाव बसरगे, गडहिंग्लज), पोलीस निरीक्षक मधू श्रीपती सकट(56) रा.निपाणी लिंमगाव,पोस्ट माळी चिंचोरे ता.नेवासा,जि.अहमदनगर (सध्या SRP कॅम्प,कसबा बावडा ), लेखनिक, सहा.फौजदार रमेश शिरगुप्पे (33)रा.संभाजीपुर, शिरोळ, जि.कोल्हापूर, हजेरी मास्तर आनंदा महादेव पाटील (36) रा.बस्तवडे ता.कागल, क्लार्क राजकुमार रामचंद्र जाधव (53) रा.लखनापूर,चिकोडी, जि.बेळगाव, सद्या रा.प्रिन्स, शिवाजी नगर कसबा बावडा, कोल्हापूर आणि पोलीस शिपाई प्रवीण प्रधान कोळी (28) रा.अब्दुललाट, ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.


यापैकी हजेरी मास्तर आनंदा पाटील याने ऑगस्ट 2018 मध्ये होणाऱ्या विभागाअंतर्गत क्रीडा स्पर्धेच्या सरावासाठी आलेल्या एकूण 23 खेळाडूंना त्रास न देण्यासाठी आणि कोणताही बंदोबस्त न देण्यासाठी प्रत्येकी 5000 रुपयांची लाच मागितली होती. हे पैसे वरपर्यंत द्यावे लागतात असे सांगून तात्काळ रक्कम जमा करण्यासाठी तगादा लावला होता. काहींनी घाबरून पैसे दिले आहेत. उर्वरित 8 खेळाडूंनी मात्र पैसे दिले नव्हते. त्यामुळे आनंदा पाटील याने तक्रारदारास सर्वांकडून रक्कम जमा करून आणून दे असे सांगितले होते.

तसेच तक्रारदारास हवे असलेले 1 लाख रूपयांचे कर्ज विभागातील कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतुन मंजूर करून देण्यासाठी संस्थेचा पदाधिकारी असलेला सहायक फौजदार शिरगुप्पे याने 5000 रुपये मागितले होते. क्लार्क राजकुमार जाधव याने खेळाडूंना मिळणाऱ्या सरावाच्या दैनंदिन 175 रुपये भत्त्याची एकूण जमा रक्कम काढून देण्यासाठी लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.


प्राप्त तक्रारीनुसार काल पंचानी तक्रारीची खातरजमा करून घेतली. मात्र सायंकाळी कार्यालय बंद झाल्याने आज सकाळी सापळा लावून 40 हजाराची रक्कम आनंदा पाटील यांच्याकडे नेऊन देण्यात आली. त्याने वरिष्ठांना दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर शिरगुप्पे याने त्यातील 2000 रुपये काढून घेतले आणि उर्वरित 3 हजार रूपये नंतर घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सर्वांच्या मागणीनुसार प्रत्येकाने आपली रक्कम काढून घेतली आणि उर्वरित 27 हजाराची रक्कम बँकेतून ट्रान्स्फर करण्यासाठी कोळी शिपायाला देण्यात आली. कोळी ही रक्कम कार्यालयाबाहेर घेऊन जात असतानाच तक्रारदाराने खुणवल्याने त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर प्रत्येकाच्या हाताला 40 हजाराच्या रकमेतील नोटांना लावण्यात आलेली अंथ्रासीन पावडर लागल्याने स्वीकार केलेल्या रकमेसह सर्वाना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर करत आहे असे उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


या कारवाईत पोलीस उपअधीक्षक गोडे यांच्यासह, पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सहा.फौजदार शाम बुचडे, पोलीस हवालदार मनोज खोत, पोलीस नाईक शरद पोरे,नवनाथ कदम, पोलीस शिपाई रूपेश माने, मयूर देसाई आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

 पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...संबंधित लाचखाेर अधिकार‌्यांचे फाेटाे...

बातम्या आणखी आहेत...