आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीत कृष्णा नदी पात्रात मगरीने 14 वर्षीय मुलाला ओढून नेले; शोधकार्य सुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- कृष्णा नदीत मगरीने 14 वर्षीय मुलाला ओढून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  सागर डंक असे या मुलाचे नाव असून पहाटेपासून त्याचा शोध सुरु आहे. शोधकार्यात यासाठी वनविभाग पाच बोटींची मदत घेण्यात येत आहे. पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावात ही घटना घडली आहे. 

 

सूत्रांनुसार, काल (शुक्रवार) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास काही मुले पोहोण्यासाठी नदीवर गेले होते. अचानक एका मगरीने सागरवर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेले. मगरीच्या हल्ल्यानंतर सागरच्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला. गावकर्‍यांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तो पर्यंत मगर पसार झाली.

 

मामाच्या गावी आला होता सागर...
सागर हा मूळचा बेळगावचा आहे. तो शाळेला सुट्या लागल्यानंतर मामाच्या गावी आला होता. शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती, पण त्यात यश आले  नाही. त्यामुळे शनिवारी पहाटेपासून सागरचा शोध घेण्यात येत आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...