आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात कोसळधारा..पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. शनिवारी पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी 63 गावांचा संपर्क तुटला आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम

मिळालेली माहिती अशी की,  बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदीचे पाणी घुसले आहे. नदीचे पाणी कोल्हापूर-राजापूर रस्त्यावर आले आहे. जिल्हयात 16 घरांची पडझड झाली आहे. 5 राज्यमार्ग आणि 16 जिल्हामार्गांवर पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक वळवली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती दर्शवणारा व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...