Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Palus-kadegao byelections congress Candidate elected on unopposed

पलूस- कडेगाव पोटनिवडणुकीत भाजपची माघार, विश्वजित कदम बिनविरोध

वृत्तसंस्था | Update - May 14, 2018, 06:52 PM IST

पलूस- कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांच्यासह सात उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे

  • Palus-kadegao byelections congress Candidate elected on unopposed

    सांगली- पलूस- कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांच्यासह सात उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे

    काँग्रेसचे माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर 28 मे रोजी निवडणूक होणार होती. विश्वजित कदम यांच्यासह 8 उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. काँग्रेसने या मतदारसंघात बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सुरुवातीपासून खूप प्रयत्न केले. त्याला प्रतिसाद देत शिवसेनेने विश्वजित कदम यांना पाठिंबाही जाहीर केला. मात्र, भाजपने कदम यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे सांगलीचे जिल्हा परीषद अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी अखेरच्या क्षणी संग्रामसिंग देशमुख यांच्यासह इतर सातही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.

    भाजपने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. आता या मतदारसंघात विश्वजित कदम यांच्याविरोधात एकही उमेदवार रिंगणात नसल्यामुळे त्यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Trending