आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाखांच्या बनावट नाेटा जप्त, छापण्यासाठी वापरलेले प्रिंटरही जप्त, दोघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर- दाेन हजार, दाेनशे व शंभर रुपयांच्या बनावट नाेटा छापून त्या चलनात अाणणारे रॅकेट पाेलिसांनी काेल्हापुरात उद्ध्वस्त केले.  या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ४९ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा, कलर प्रिंटर, बाँड पेपर्सही पोलिसांनी जप्त केले आहेत. विश्वास अण्णाप्पा कोळी, जमीर अब्दुल कादर पटेल अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही धडक कारवाई केली आहे.  


शहरात बनावट नाेटांची छपाई करून ते चलनात अाणणारे एक रॅकेट काम करत असल्याची माहिती पाेलिसांनी खबऱ्यांकडून मिळाली हाेती. त्यावरून पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या नेतृत्वात पथकाने वळीवडे रेल्वेस्थानक परिसरातील गांधीनगर भागात  छापा टाकून विश्वास अण्णाप्पा कोळी  (२७, रा. आलास, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आणि जमीर अब्दुल कादर पटेल (३२, रा. १६, मु.पो. कनवाड ता शिरोळ, जि. कोल्हापूर) या दोघांना अटक केली. दाेन्ही आरोपींची पाेलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. तसेच विश्वास कोळी याच्या घरातून कलर प्रिंटर आणि नोटा छपाई करण्याचा कागद जप्त करण्यात अाला. या अाराेपींचे इतर साथीदार अाहेत का याची चाैकशी पाेलिस करत अाहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो आणि इतर माहिती

बातम्या आणखी आहेत...