आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kolhapur: अंबाबाई मंदिरात होणार प्राथमिक आरोग्य केंद्र, 25 मेला उद्‍घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- अंबाबाई मंदिरामध्ये प्राथमिक आरोग्य उपचार केंद्राचे उद्‍घाटन सोहळा उद्या (ता. 25) सकाळी 9 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

मंदिरामध्ये प्राथमिक उपचार केंद्र हे सामाजिक बांधिलकी     म्हणून सुरू करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये दिवसेंदिवस होणारी भक्तांची गर्दी आणि त्यांना सुविधा पुरवणे हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे महेश जाधव यांनी सांगितले. या आरोग्य केंद्रामध्ये जनरल चेकअप, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, गरजेनुसार कार्डिओग्राम तसेच मलम पट्टी सुविधा, प्रथमोपचारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या केंद्रात सेवाभावी डॉक्टर सेवा देणार आहेत. सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत असून भविष्यात गोरगरीब रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यविषयक माहिती, आहाराविषयी माहिती अशी शिबिरे सुद्धा घेण्यात येतील असेही महेश जाधव यांनी सांगितले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पवार, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव,डॉ.संदीप पाटील आदी उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...