आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात स्टंटबाज तरुणाला डॅशिंग तरुणीने दाखवला इंगा, भर चौकात चोपले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर– वेगात दुचाकी चालवणाऱ्या एका स्टंटबाज तरुणाने महिलेच्या मोपेडला धक्का दिला. भरधाव वेगात तो तसाच पुढे निघाला. तरुणाच्या कृत्यामुळे संतापलेल्या डॅशिंग तरुणीने तरुणाचा पाठलाग केला. मिरजकर तिकटीजवळ त्याला गाठून आपली मोपेड त्याच्या दुचाकीला आडवी केली. क्षणाचाही विचार न करता चंडीचे रूप धारण करून तरुणीने त्याला भर चौकात चांगलाच चोप दिला.

 

या प्रकारामुळे सुरुवातीला कोणाला काहीच समजत नव्हते. तरुणाची चूक कळाल्यावर मात्र बघ्यांनी चंडीचे रूप धारण केलेल्या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले. ही घटना चौकातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...