आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा गाळात फसून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- हातकणंगले येथील आण्णासाहेब डांगे विद्यालयात शिकणारे दोन शालेय विद्यार्थी सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर जैन बस्तीजवळील विहिरीत पोहायला गेले असता गाळात अडकून त्यांचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

 

6 वीच्या वर्गात शिकणारे आमीन मुजावर (11) आणि अपान सय्यद (11) विहिरीत पोहत होती. त्यावेळी त्यांच्या बरोबरच अन्य मुलेही विहिरीत पोहायला आली होती. दोघांना गाळात अडकलेले पाहून बाकीच्या मुलांनी जोरात आरडा ओरडा केल्याने गावकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. नाकातोंडात आणि पोटात पाणी गेलेल्या या दोन्ही मुलांना बेशुद्ध अवस्थेत विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढले. तात्काळ हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाकडे उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही मुले मृत झाल्याचे घोषित केले. आमीन आणि अपानच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरात केलेला आक्रोश पाहुन उपस्थितांचे हृदय हेलावले. घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...