आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरातून चोरीला गेला होता 12 लाखांचा एेवज, पुजारीच निघाला टोळीचा सूत्रधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- जयसिंगपूरातील  येथील जैन श्‍वेतांबर मंदिरात महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा गुन्ह्यात एलसीबीने  राजस्थानमधील दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, दागिने असा 12 लाख 43 हजार रुपये  किंमतीचा ऐवज जप्त केला. मंदिरातील सहायक पुजार्‍यानेच राजस्थान येथील कुख्यात टोळीला हाताशी धरून चोरीचा कट रचल्याचे उघड  झाले आहे. यामध्ये चोरीमध्ये सामिल इतर चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत. 

 

शंकर उर्फ सिकाराम भारमाजी गरासिया (वय 26), धन्नाराम दौलाराम गरासिया (19, पाट्रीयाकी ढाणी, शिंगटाभाटा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) अशी चोरट्यांची नावे आहेत. आणखी चौघेजण पसार झाले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेशसह गुजरातेत संशयितांविरुद्ध दरोडा, लुटमार, चोरीसह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन श्‍वेतांबर मंदिरात काम करणार्‍या शंकर उर्फ सिकाराम यानेच सराईत टोळीला हाताशी धरून मंदिरात चोरी केल्याचे उघड झाले आहे.चोरट्याकडून साडेचार लाखांची रोकड, 4 लाख 86 हजार रुपये किमतीचे 18 तोळ्यांचे सोन्याचे तीन हार, 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा चांदीचा पाट जप्त केला आहे. अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, जयसिगंपूरचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, ‘एलसीबी’चे  निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने ही कामगिरी बजाविल्याचे मोहिते यांनी सांगितले.

जयसिंगपूर येथील स्टेशन रोडवरील तिसर्‍या गल्लीच्या कोपर्‍यावर दि. 13 मार्च रोजी मध्यरात्रीला जैन श्‍वेतांबर मंदिर आवारातील कार्यालय फोडून कपाटातील रोकड, दागिन्यासह 15 लाखांचा ऐवज लंपास केला होता. मंदिरातील कामगार शंकर उर्फ सिकारामने व्यवस्थापन समितीकडे जादा पगाराची मागणी केली होती. त्यास नकार दिल्याने तो डूख धरून होता. होळीच्या सणानिमित्त शंकर उर्फ सिकाराम 27 फेब्रुवारीला राजस्थानला गेला. बाली जिल्ह्यातील सराईत टोळीशी संगनमत करून त्याने जैन श्‍वेतांबर मंदिरातील चोरीचा कट रचला. शंकरसह सहा संशयित दि.12 मार्चला ट्रॅव्हल्सने राजस्थानातून जयसिंगपुरात आले. सायंकाळी शंकरने मंदिराची रेकी करून चोरट्यांना मंदिरातील अंतर्गंत रचनेची माहिती दिली. मध्यरात्री दीडला मंदिराचे कार्यालय फोडून सुमारे 15 लाखाचा किंमती ऐवज लुटला.

बातम्या आणखी आहेत...