आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुर्यही करतो लक्ष्मीमातेच्या चरणांना स्पर्श; जाणून घ्या कोल्हापुरच्या महालक्ष्मीचा महिमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवीला परंपरेनुसार साडी घालण्यात येते. - Divya Marathi
देवीला परंपरेनुसार साडी घालण्यात येते.

कोल्हापूर- दरवर्षी रथसप्तमीला कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात होणार किरणोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविक जमतात. सुमारे 3 दिवस चालणारा हा किरणोत्सव पश्चिम महाराष्ट्रातील महालक्ष्मीच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वपुर्ण असतो. पहिल्या दिवशी सुर्याची किरणे महालक्ष्मीच्या पदांना स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी ही किरणे महालक्ष्मीच्या अन्य भागांवर पडतात तर तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर पडतात. श्री महालक्ष्मी मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. 

 

 

1800 वर्ष जुने मंदिर
- मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरुन लक्षात येते की हे मंदिर 1800 वर्ष जुने आहे.
- शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. काळातराने तेथे अजुन 30 ते 35 मंदिरे बांधण्यात आली.
- 27 हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली होती.
 
 
नाही मोजता येत मंदिराचे खांब
- मंदिराबाबत असे सांगण्यात येते की या मंदिराच्या खांबाशी निगडित एक रहस्य आहे. ते सोडविण्यात विज्ञानालाही अद्याप यश आलेले नाही. 
- मंदिराच्या चारही दिशांना एक-एक दरवाजा आहे. याच्या खांबाबाबत मंदिर प्रशासनाचा दावा आहे की याची मोजदाद कुणालाही करता येत नाही.
मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानूसार अनेक लोकांनी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला. पण असे करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घटना घडल्या.
- विज्ञान अद्याप यामागील कारणाचा शोध घेऊ शकलेले नाही. कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात यश आले नाही.
 
 
मंदिरात अजुन काय आहे खास
- सांगण्यात येते की देवी सतीचे 3 नेत्र येथे पडले होते. येथे महालक्ष्मीचा निवास असल्याचे सांगण्यात येते.
- मंदिरात होणारा किरणोत्सवही विशेष असतो. वर्षातुन एकदा महालक्ष्मीच्या मुर्तीवर सुर्यकिरण पडतात.
- या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरात महालक्ष्मीची 3 फुट उंच चतुर्भुज मुर्ती आहे.
- काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णुचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला आली.
- काही वर्षांपासून तिरुपती देवस्थानाहून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती. 
- कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर निवासी अंबाबाई असेही म्हटले जाते.
- दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असेही म्हटले जाते.
 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...