Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | kolhapur ambabai tembple news upadates

अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी मुलाखती वादाच्या भोव-यात, सामाजिक संघटनांचा विरोध

प्रतिनिधी | Update - Jun 18, 2018, 08:55 PM IST

त्यामुळे आता देवस्थानच्या अखत्यारीत व्यवस्था व कार्यभार रहाणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी

  • kolhapur ambabai tembple news upadates

    कोल्हापूर - अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन राज्य शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केले जाते. राज्य शासनाकडून श्री.करवीर निवासिनी अंबाबाई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा 12 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्यानुसार वंशपरंपरागत पूजा-यांचे हक्क संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता देवस्थानच्या अखत्यारीत व्यवस्था व कार्यभार रहाणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    तात्पुरता पुजारी पगारी नेमणुकीसाठी 117 अर्ज आले आहेत, यामधून 55 पूजारयांची नेमणूक केली जाणार असून त्यासाठी सहा तज्ञ लोकांकडून मुलखती घेण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी पारंपरिक एकाही पुजऱ्याने अर्ज केलेला नाही, तसेच या प्रक्रियेवर या पुजाऱ्यानी बहिष्कार टाकला आहे. विविध संघटनांनीही कडाडून विरोध केला आहे. देवस्थान समितीचा कारभार कायदेशीर असल्याचे कार्यकारणीने आज स्पष्ट केले. कायद्याची अंतिम अधिसुचना जाहीर केल्यानंतर अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध करून पगारी पुजारी नियुक्त केले जातील अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले आणि मंगळवारपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत असे सांगितले.

    पगारी पुजारी नेमण्याची तात्पुरती व्यवस्था आहे असेही जाहीर केले. अंबाबाईचे सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी नियुक्त पूजाऱ्याना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल. पुजारी निवडीचे अंतिम अधिकार देवस्थान समितीच्या हातात असल्याचेही जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्याकडे राज्यातील 23 तालुक्यातील 3042 मंदिराची सुमारे 27,000 जमीन आहे. हया जमिनीवर अनेकांनी चुकीच्या पध्दतीने कारभार केला आहे. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या जमिनीची डीजीटायझेशन करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Trending