Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | kolhapur mumbai flight started after six years

कोल्हापुरातून 6 वर्षांनी झाले विमानाचे टेकआॅफ, दिव्यांग, कष्टकरी महिलांनी घेतला प्रवासाचा आनंद

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2018, 05:46 PM IST

गेल्या सहा वर्षांपासून बंद पडून रखडलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ आज दुपारी तीन वाजता एअर डेक्कन कंपनीच्या विम

 • kolhapur mumbai flight started after six years

  कोल्हापूर - राजकीय श्रेयवादाच्या विळख्यातून सुटलेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज अखेर विकासाच्या दिशेने झेपावले. केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत कोल्हापूरची गेल्या सहा वर्षांपासून बंद पडून रखडलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ आज दुपारी तीन वाजता एअर डेक्कन कंपनीच्या विमानाच्या टेकऑफने झाला.

  कोल्हापूरकरांनी आज पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेचे अनोख्या जल्लोषात स्वागत केले. मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या आजच्या पहिल्या विमानातून चक्क दिव्यांग मुले, कष्टकरी महिला,आणि विद्यार्थ्यांना प्रवास घडवून कोल्हापूरचा राजर्षी शाहूंचा वारसा जपण्यात आला. याकामी कोल्हापूरचे देशात पहिल्या क्रमांकावर असणारे खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेतला.

  दुपारी मुंबईतुन एक वाजून 25 मिनिटांनी कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या विमानाने खासदार धनंजय महाडिक, क्रेडाई कोल्हापूरचे पदाधिकारी, हॉटेल मालकसंघ,गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी आदी काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला.
  कोल्हापूर मधून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी हेच विमान मुंबईकडे झेपावले.ज्यामधून हेल्पर्स ऑफ हँडीकॅप्ड ,अंधशाळा, बालकल्याण संकुलातील दोन दोन मुले, एकटी संस्था, महिला बचत गटाच्या दोन महिला,मुलांना आणि एका शेतकरी दाम्पत्याला प्रवासाची संधी मिळाली.यावेळी कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या वतीने मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांना अल्पोपहार देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


  ज्यांनी कधीच विमानाने प्रवास केलेला नाही आणि केवळ आकाशात उडणारे विमान पाहण्याचा योग्य असणाऱ्या सर्वसामान्य वर्गातील लोकांना विमान प्रवास घडवून खासदार धनंजय महाडिक यांनी आज आपले वेगळेपण आणि समाजाप्रती असलेले प्रेम सिद्ध केले.

 • kolhapur mumbai flight started after six years

Trending