आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कोल्हापूर वाय फॉर एच\' समाजाच्या सेवेत रुजू, निवडक पत्रकारांच्या हस्ते उदघाटन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- एका साध्या आणि सुटसुटीत संकल्पनेसाठी एकत्र येत कोल्हापूरसाठी सामाजिक काम करणाऱ्या नामांकित व्यक्ती आणि संस्थानी आज शहरातील काही निवडक पत्रकारांच्या हस्ते कोल्हापूर वाय फॉर एच या संस्थेचे उदघाटन करण्यात आले. 

 

यावेळी पत्रकार विजय कुंभार, पत्रकार समीर मुजावर, पत्रकार अनुराधा कदम,पत्रकार विजय पाटील,पत्रकार संभाजी गंडमाळे, पत्रकार धीरज बरगे,प्रेस छायाचित्रकार शशिकांत मोरे वाचन कट्ट्याचे युवराज कदम आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचा उद्देश स्पष्ट करताना सागर बगाडे म्हणाले, हेल्प कोल्हापूर अंतर्गत अनाथ,बालकामगार, असाहाय्य वृद्ध, मनोरुग्ण, वृद्ध वेश्या, वृद्ध तृतीयपंथी,शाळाबाह्य मुले, दुर्गम वाड्या वस्त्यांवरील गरजू यांच्यासाठी काही योजना, सर्व वयोगटांसाठी झाडावरची शाळा तर लव्ह कोल्हापूर अंतर्गत पारंपरिक कलागुणांची जपणूक, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, बकाल विद्रुप जागांचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड, स्वच्छता, सेफ कोल्हापूर अंतर्गत स्त्रियांचा सन्मान, वाहतुकीच्या नियमांचे प्रबोधन, गावगुंडांना विरोध, स्त्रियांना आरोग्यासाठी प्रबोधन, ग्रामीण दुर्गम वाड्या वस्त्यांवरील अनवाणी पायाने फिरणाऱ्या महिलांना बेअरफुट देण्याची संकल्पन आहेत 

 

तसेच सेव्ह कोल्हापूर अंतर्गत प्रदूषण मुक्ती, आपत्ती व्यवस्थापन, सेंद्रीय शेती साठी चालना, जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न, फूड कोल्हापूर अंतर्गत विविध समारंभात,हॉटेलांमधील मेजवाण्यांमधील शिल्लक राहिलेले अन्न गोरगरीब, गरजूंना,भिक्षेकरुंना दुपारी व रात्रीच्या वेळेस पोहचवण्याचे कार्य आणि भविष्यात फूड कलेक्शन सेंटर आणि फूड डिस्ट्रिब्युशन सेंटर्स उभे करण्याचा प्रयत्न करणे या संकल्पना घेऊन कोल्हापूर वायफॉर एच या संस्थेचे कार्य चालणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान आज उदघाटना दिवशीच संस्थेच्या वतीने ताजे शिजवलेले अन्न कोल्हापूर शहराच्या चार ठिकाणी पाठवून गरजूंना अन्नदान करण्यात आले. समाजातील सर्व थरातील सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था आणि त्यांचे पदाधिकारी,सामाजिक कार्याची आवड असणारा युवावर्ग संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात अतिशय साध्या पद्धतीने समाजाच्या सेवेत रुजू झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमात ज्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यांसाजे आभार अखेरीस चित्रकार विजय टिपूगडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...