Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | man suicide when wife leave him

प्रियकरासोबत घरातून पळून गेली पत्नी, निराश पतीने गळफास घेऊन संपवले जीवन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 20, 2018, 06:19 PM IST

पोलिसांनी पत्नीसह प्रियकरावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

  • man suicide when wife leave him

    कोल्हापूर- शहरातील जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीने पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पत्नीसह प्रियकरावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरात राहणारे सतीश गोंधळे (37) यांची पत्नी प्रिया गोंधळे (35) आणि विनायक कुलकर्णी याचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या या प्रेम प्रकरणामुळे सतीश प्रचंड तणावात होते. प्रिया आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने त्यांना प्रचंड नैराश्य आले. यातूनच त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी मयताचा भाऊ चिदानंद गोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिस तपास करत आहेत.

Trending