आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांच्या गावात साहित्य संमेलनासाठी सरकार अनुकूल पण 'मसाप'चा विरोध, सांगितले हे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ भिलार मध्ये पुस्तकाचे गाव वसले आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ भिलार मध्ये पुस्तकाचे गाव वसले आहे. (फाइल फोटो)

महाबळेश्वर- भिलारला संमेलन व्हावे ही मनापासून इच्छा आहे. आता हा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखांनी आणि तसेच महामंडळाने घ्यावा, शासन त्याला पूर्ण मदत करेल, किंबहुना शासन साहित्य संमेलनाला मदत करतच असते अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक तथा भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. याला मात्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने ठाम विरोध दर्शविला आहे.

 

महाबळेश्वर तालुक्यातील भिलारला पुस्तकांचे गाव वसवुन एक वर्ष झाले या निमित्त त्यांनी 'दिव्य मराठी'शी विशेष संवाद साधला. अखिल भारतीय मराठी महामंडळातर्फे होणारे साहित्य संमेलन भिलारला घ्यावे असे निमंत्रण वजा प्रस्ताव तावडे यांनी बडोदा येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनाची भाषणातून मांडला होता. त्यावर तावडे म्हणाले की, आता पुस्तकांचे गाव छान वसले आहे. लोकांनाही माहिती झाले आहे. त्यामुळे हे पुढील साहित्य संमेलनाची भिलारला घ्यावे, याची संपूर्ण जबादबारी राज्य शासन उचलेल. पण, या प्रस्तावानंतर मात्र साहित्यिकांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली. शासनाने संमेलन आयोजित केले तर शासनाचा वरचष्मा राहील अशा एक मतप्रवाह पुढे आला. यावर तावडे म्हणाले की, शासनातर्फे आपण एक प्रामाणिक मागणी महामंडळाकडे केली. पण, येथे संमेलन घ्यायचे की नाही या विषयी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने किंवा महाबळेश्वर शाखेने तसेच साहित्य महामंडळाने घ्याव्या. या विषयी खर्चाची आणि आयोजनाची सगळी जबाबदारी शासनाची असेल. 

 

आमचा ठाम विरोध

भिलारला संमेलन घ्यावे यासाठी आमचा ठाम विरोध आहे. शासनाने संमेलन आयोजित केले तर ते शासनानेच होईल, संमेलनाच्या इतिहासात कधीही शासनाने सांमेलनाचे आयोजन केले नाही. भिलारला अखिल भारतीय साहित्य संमेलन होईल अशी व्यवस्था तिथे नाही. साहित्यिकांसह वाचक तेथे येतील का या बाबत शंका आहे.  सातारा शाखेच्या पदाधिका-यांना कधीही विश्वासात घेतले जात नाही. आता एव्हडा मोठा कार्यक्रम असूनही आमच्या शाखेतील कोणालाही निमंत्रण नाही. असे होत असल्याने भिलारला संमेलन व्हावे याला आमचा ठाम विरोध आहे. येथे संमेलन घ्यावे यासाठी आम्ही निमंत्रण देणार नाही  -विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी, मसाप सातारा शाखा

 

निमंत्रणच नाही
भिलारला संमेलन घ्यावं असे सांस्कृतिक तथा भाषा मंत्री विनोद तावडे बडोद्याच्या साहित्य संमेलनात म्हणाले होते. पण, संमेलन घ्यायचं असेल तर कोणत्या तरी संस्थेने वा मसापच्या शाखेने प्रस्थाव अथवा लेखी निमंत्रण द्यावं लागतं. भिलारच्या बाबतीत असे काहीच वा कोणीच निमंत्रण दिलेले नाही. मग, या प्रस्तावाचा कसा विचार करावा? समजा असे निमंत्रण आलेच तर महामंडळाचे पदाधिकारी विचार करतील. - श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य महामंडळ

बातम्या आणखी आहेत...