Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | minister chandrakant patil replies to criticism of apposition

चंद्रकांत दादा म्हणाले- आता माझी सटकली! मी पक्षाचा बलाढ्य नेता, विरोधकांनी लक्षात ठेवावे

प्रतिनिधी | Update - Apr 13, 2018, 07:04 PM IST

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई रोकण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास खात्याच्या आदेशानुसार व अतिक्रमणे

  • minister chandrakant patil replies to criticism of apposition

    कोल्हापूर– तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई रोकण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास खात्याच्या आदेशानुसार व अतिक्रमणे नियमित करण्याच्या कायद्यात बसवण्यासाठी मुंबईतील बैठकीत झालेला निर्णय आहे. त्याता माझा वैयक्तिक काही हस्तक्षेप नाही. तरी देखील विरोधक माझ्यावर बेताल आरोप करीत आहेत, त्यामुळे आता माझी सटकली आहे, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


    चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या वीस वर्षात ज्यांनी शासकीय जमिनीवर आरक्षणे हटवून आपली हॉटेल्स, शिक्षणसंस्था आणि मंगलकार्यालये उभी केली आहेत त्या सर्व प्रकरणाची यादी मी मागवली आहे. या सर्व प्रकरणांची मुळापर्यंत जाऊन चौकशी करून कारवाई करणार आहे. तसेच, मी राज्याचा नंबर दोनचा मंत्री आणि पक्षाचा बलाढ्य नेता आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.


    तावडे हॉटेल परिसरातील अडीचशे एकरवर असलेले अनाधिकृत बांधकाम मनपाच्या वतीने हटवण्याच्या प्रक्रियेला मुंबईतील बैठकीत स्तगिती देण्यात आली होती. ही स्थगिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तक्षेपामुळेच देण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामधाम येथे पत्रकार परिषद घेवून थेट काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना लक्ष्य केले. यावेळी ते म्हणाले की, चिल्ल्या-पिल्ल्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःला नेते म्हणवणाऱ्यांनी समोर येवून बोलावे.


    तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई थांबवण्याचा निर्णय नगरविकास खात्याच्या नियमानुसार असून, 500 चौ. फुट बांधकाम नियमित करणे आणि 2000 चौ फुट बांधकामासाठी रेडीरेकनर प्रमाणे किंमत धरून त्यावर दंड आकारून ही बांधकामे नियमित करण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यासाठी या परिसरातील सर्व सर्वे नंबर, त्यावरील बांधकामे, बांधकामासाठी घेतलेले परवाने, टाकलेले आरक्षण याबाबत एक अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही जागा महापालिकेची असल्याचा निर्णय अलीकडील आहे आणि बांधकामे त्याच्या कितीतरी आधी करण्यात आली आहेत. त्यामुळे 2015 च्या शासन आदेशानुसार ही बांधकामे नियमित करता येतात. असे असताना माझ्यावर आरोप केले गेले आहेत. हे सर्व विरोधासाठी विरोध म्हणून सुरु आहे. पण गेल्या 20 वर्षात कोल्हापूर शहरातील अनेक जागांवरील आरक्षणे उठवून त्याचा मूळ हेतू बदलून त्या जागेवर उभारलेली हॉटेल्स, शिक्षण संस्था, पार्किंग, मंगलकार्यालये यांची मूळाशी जाऊन चौकशी करून त्यांच्यावर खटले दाखल करणार असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

Trending