Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Minister Chandrakant Patil talks about Maratha reservation

मंत्र्यांच्‍या गाड्या फोडून आरक्षण मिळत असेल तर खुशाल फोडा, निर्णय आता कोर्टाच्‍या हातात- चंद्रकांत पाटील

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 24, 2018, 03:11 PM IST

मराठा आरक्षणासाठी सरकारने जे करायला हवे होते ते केले. आता निर्णय न्‍यायालयाच्‍या कक्षेत आहे- चंद्रकांत पाटील

 • Minister Chandrakant Patil talks about Maratha reservation

  सांगली- मराठा आरक्षणासाठी सरकारने जे करायला हवे होते ते केले. आता निर्णय न्‍यायालयाच्‍या कक्षेत आहे. त्‍यावर सरकार काहीही करू शकत नाही, तरीही मंत्र्यांच्‍या गाड्या फोडून आरक्षण मिळत असेल तर फोडा, असे हतबल उद्गार राज्‍याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले आहेत. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.


  पेड लोक आंदोलनात घुसले
  आतापर्यंत शांततापुर्ण वातावरणात चाललेले हे आंदोलन हिंसा करून बदनाम करण्‍याचा काही लोक प्रयत्‍न करत आहेत. आगामी निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन आणखी भडकावण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. यासाठी काही पेड लोक आंदोलनात शिरले आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच ख-या आंदोलकांनी या पेड लोकांना ओळखून त्‍यांना खड्यासारखे बाजूला करायला हवे, असेही ते म्‍हणाले.


  पंढरपूरमध्‍ये 7 लाख वारकरी अडकून...याला जबाबदार कोण?
  मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरूणाला जीव द्यावा लागला ही दु:खद बाब आहे. पण या मार्गाने कधीही प्रश्‍न सुटणार नाही. सरकार नेहमी आंदोलकांसोबत चर्चेस तयार आहेत, असे पाटील म्‍हणाले. यासोबतच जी गोष्‍ट सरकारच्‍या हातात नाही, त्‍यासाठी सरकारला दोष देण्‍यात काहीही अर्थ नाही. मराठा आरक्षण आता न्‍यायालयाच्‍या अखत्‍यारीतील बाब आहे. यासाठी जे करायला हवे होते ते सरकारने केले, असे देखील चंद्रक्रांत पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. मात्र हिंसक आंदोलनामुळे सामाजिक शांततेला गालबोल लागत असून सध्‍या पंढरपूरमध्‍ये 7 लाख वारकरी अडकून आहे, याला जबाबदार कोण? असा सवालही त्‍यांनी केला.

Trending