आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • बेवारस जनावराला शेतातून हिसकावण्‍यास गेल्‍यास गोरक्षक धमकी देतो राजू शेट्टी, MLA Raju Shetty Criticizes BJP Government

बेवारस जनावराला हुसकावले तरी गोरक्षक धमकी देतात, शेतक-यांनी करायचे काय?- राजू शेट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूर येथे कार्यक्रमादरम्‍यान खासदार राजू शेट्टी. - Divya Marathi
कोल्‍हापूर येथे कार्यक्रमादरम्‍यान खासदार राजू शेट्टी.

कोल्हापूर-  'देशात गोवंश कायदा असल्याने या देशात दूध न देणाऱ्या जनावरांना चक्क देवाच्या नावान सोडल जात. ही बेवारस जनावर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचं नुकसान करत आहेत. त्यांना हुसकावून लावण्‍यास शेतकरी गेला की एखादा गो रक्षक येतो आणि गायीं आणि गोवंशाला हात लावायचा नाही म्हणून धमकावतो. आता करणार काय?', असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी कोल्‍हापूर येथे विचारला. शाहू स्‍मारक भवन येथे एका कार्यक्रमादरम्‍यान ते बोलत होते.

 

शेट्टी पुढे म्‍हणाले, 'देशी गाय असेल तर ठीक हो, ती जरा कमी खाते. पण जर्सी गाय काय कमी खाते? आता गायीचं ठीक आहे. पण बैलांचं काय? गल्ली पासून दिल्लीपर्यंत नुसती बैलं सांभाळायची कामं आम्ही करत आहोत', असा उपहासात्‍मक टोला त्‍यांनी यावेळी लगावला. 'मी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने डेन्मार्क आणि इतर देशात शेती आणि शेतीपूरक धंद्यांच्या पाहणीसाठी गेलो. त्या ठिकाणी भाकड जनावरांना स्लॉटर हाऊसमध्ये पाठवतात. मात्र आपल्‍याकडे गोवंश कायदा असल्‍याने त्‍यांना देवाच्‍या नावाने सोडल जाते, असे ते म्‍हणाले.

 

यावेळी राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच 'आता काँग्रेस पक्षासोबत आम्ही जात आहोत. यावेळी मात्र पहिल्यासारखे त्यांनी करू नये. शेतकऱयांची फसवणूक होऊ नये याची खबरदारी घ्यावी', असे आवाहन व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांना केले.

 

 

बातम्या आणखी आहेत...