आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी फलकांसाठी MNS आक्रमक; कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बजावल्या नोटीसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/पुणे/कोल्हापूर- कऱ्हाड शहरातील व्यापाऱ्यांना मराठीत बोर्ड लावण्यासाठी शाॅप अॅक्ट अधिकाऱ्यास प्रत्यक्ष सोबत घेवून येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटीसा बजावल्या. त्या मागणीसाठी शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 

मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शाॅप अॅक्ट कार्यालयावर गेले. तेथे मराठीत बोर्ड लावण्याची मागणी केली. त्यावेळी आंदोलनकर्ते थेट अधिकाऱ्यांना घेवून मराठीत बोर्ड नसलेल्या व्यापाऱ्यांकडे गेले. तेथे त्यांना प्रत्यक्ष नोटीसा बजावल्या. या कार्यकर्त्यांकडून पाच व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या. बोर्ड न बदलल्यास व त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन होईल. त्याला शासन जबाबदार राहिल. असेही यावेळी मनसेने स्पष्ट केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 
बातम्या आणखी आहेत...