आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव यांनीच दिला बाळासाहेबांना त्रास; तोंड बंद ठेवा अन्यथा मातोश्रीवरील गुपिते फोडू- राणेंचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले महाराष्‍ट्र स्वाभिमानी संघटनेचे नेते नारायण राणे यांनी पु्न्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बांधणीसाठी सांगलीत दाखल झाले आहेत.

 

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बाळासाहेबांना त्रास दिल्याचा आरोप राणेंनी केला आहे. उद्धव यांनी आता त्यांनी तोंड बंद ठेवले नाही तर, त्यांनी काय त्रास दिला हे उडघडकीस आणेल, अशा शब्दांत राणेंनी इशारा दिला आहे. उद्धव यांनी माझ्यावर टीका टिप्पणी करण्याऐवजी विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम करावे, असा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत.

 

2017 मध्ये मी मंत्री होणार...
मुख्यमंत्री फडणवीस हे माझा विश्वासघात असे त्यांच्या वागण्यावरून वाटत नाही.  मी 2017 मध्येच मंत्री होणारच, असा दावा देखील नारायण राणे यांनी सांगलीत केला आहे.

 

गुजरात निवडणुकीत काहीही होऊ देत, माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. परंतु राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... राणे म्हणाले... उद्धव यांना राजकारणाचा अजिबात गंध नाही..

 

बातम्या आणखी आहेत...