आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात पाकिस्तानचा ध्वज जाळला; जाधव कुटुंबियांना अपमानास्पद वागणुकीचा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला  पाकिस्तान सरकारकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याच्या  निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यानी आसमंत दुमदुमून सोडत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि जोरदार  निदर्शने केली.

 


भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत.पाकिस्तान सरकारने काही महिन्यांपूर्वी त्यांना फाशी देण्याचा कुटील डाव आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावला. बर्‍याच प्रयत्नांनतर कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात पाकिस्तानामध्ये  त्यांच्या कुटुंबियांच्या महिलांना हिन दर्जाची वागणूक देण्यात आली. मंगळसूत्र, टिकली, चपला काढून पाकिस्तानने भारतीय स्त्री संस्कृतीचा अपमान केला गेला. प्रत्यक्षात भेट न देता काचेच्या आडून भेट घेण्यास भाग पाडले. हा त्यांच्या कुटुंबियांचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान आहे. कुलभूषण जाधव यांना सोडविण्यात केंद्र सरकार कुचकामी ठरत आहे.असा आरोप यावेळी करण्यात आला.

 


शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहराध्यक्ष दुर्गेस लिंग्रस, शिवाजी जाधव, रवी चौगुले, राजू यादव, अवधूत साळोखे, रणजित आयरेकर, महिला आघाडीच्या शुंभागी पवार, रिया पाटील, मीना भोसले, पूजा मिसाळ, जयश्री खोत,सुजाता सोहनी, सुनिता निकम, सुवर्णा कारंडे,  आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...