आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडीचे गज तोडून पळाले होते 4 आरोपी, पोलिसांनी 24 तासांतच केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर-  घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी लॉकअपच्या दरवाजाचे गज वाकवून शुक्रवारी पहाटे पलायन केले होते. त्यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या आरोपींना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घुणकी गावाजवळ अटक केली. 

 

हे आरोपी पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला होता.सूरज सर्जेराव दबडे (वय 22, रा. वाठार पैकी कासारवाडी, ता. हातकणंगले),ओंकार महेशसूर्यवंशी (वय 19, रा. बँक ऑफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), गोविंद वसंत माळी (वय 19, रा. यशवंतनगर कॉलनी, कासेगाव, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (वय 19, रा.  दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...