आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या हाकेला वेश्यांनी दिली साथ, हातात खोरे-पाटी घेऊन केले श्रमदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाऊंडेशनमार्फत राज्यभरात महाश्रम अभियान राबवण्यात येत आहे. फाउंडेशनच्या आवाहनानंतर राज्यातील विविध घटकांतील लोक या अभियानात सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. समाजाकडून नेहमीच उपेक्षित ठरलेल्या वेश्यासुद्धा या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. सांगली शहरातील वेश्या महिलांनी नुकतेच हातात खोरे-पाटी घेऊन तासगावच्या चिखलगोठण गावात श्रमदान केले. 


सांगली शहरातील सुंदरनगर वेश्या वस्तीतील वेश्यांनी कधी बाहेरचे जग माहिती नाही, कुणी अपघाताने तर कुणी मजबूरीने या व्यवसायात आलेली. पण समाजाशी त्यांची नाळ जोडली गेलेली. आपणही समाजासाठी काहीतरी करुन दाखवावे ही प्रत्येकीची इच्छा, पण समाजाचीच भिती असल्याने त्यांना काही काम करता येत नव्हते. सा-याजणींनी दुष्काळमुक्तीसाठी हाथभार लावण्याचे ठरवले आणि एक दिवस आपल्या व्यवसाय बंद ठेवून एकजूट दाखवत चिखलगोठन गाव गाठले. तिथे पाणी फाऊंडेशनच्या अभियानात सहभागी होत हातात टिकाव खोरे पाटी घेत श्रमदान केले. यासाठी दोन बसने महिला सांगलीवरुन या गावी आल्या होत्या. गावक-यांची मिळालेली साथ पाहून त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. या महिलांनी त्यांच्या संस्थेच्या अध्यक्षा अमिराबी शेख यांच्यामुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया दिली. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...