Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Rajarshi Shahu Maharaj Birth Anniversary

राजर्षी शाहू महाराजांनी दिली होती अस्पृश्यांना मराठे व ब्राम्हणांची आडणावे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 26, 2018, 12:02 AM IST

महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवला. फुलेंप्रमाणे शाहू महार

 • Rajarshi Shahu Maharaj Birth Anniversary
  राजर्षी शाहू महाराज....

  महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवला. फुलेंप्रमाणे शाहू महाराजांनी बहूजन समाज व त्यांच्या उद्धारासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासातील अग्रगण्य व्यक्ती म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. कोल्हापूर संस्थानात शिक्षणप्रसाराचे महत्वपूर्ण कार्य केले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना देत आहे त्यांच्याविषयीची खास माहिती...


  राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य...
  मानवतेच्या दृष्टीने कलंक असलेली अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे असे शाहू महाराजांचे मत होते. वेगवेगळ्या सभा-समारंभात त्यांनी ते मत व्यक्त केले. केवळ बोलून आणि ठराव करून न थांबता त्याप्रमाणे आचरण करून अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य शाहू महाराजांनी केले आहे.


  अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला...
  अस्पृश्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळेल अशी व्यवस्था केली. 1907 मध्ये कोल्हापूर येथे त्यांच्यासाठी 'मिस क्लार्क वसतिगृह' स्थापण केले. तेथे अस्पश्य विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. मराठ्यांसाठी सुरु केलेल्या व्हिक्टोरीया वसतिगृहात अस्पृश्य व मुस्लीम मुद्यार्थ्यांची देखील सोय केली. 1919 मध्ये अस्पृश्यांच्या शाळा बंद करून स्पृश्य विद्यार्थ्यांच्या शाळेत त्यांना समाविष्ट करण्याचा आदेश काढला. 1899 च्या आदेशाने शाळेत शिक्षकानी अस्पृश्यता मानायची नाही. अस्पृश्यांना इतर मुलांप्रमाणेच वागवावे अशी आज्ञा केली. त्यामुळे अस्पृश्यांमध्ये शैक्षणिक प्रसार झाला. शाहू महाराजा गाधीवर आले, तेव्हा 1894 साली संस्थानात अस्पृश्य समाजाची संख्या सुमारे 1 लाख होती. त्यांच्या शिक्षणाची गरज शाहू महाराजांनी लक्षात घेतली आणि त्यासाठी त्यांनी पुढील धोराणांचा स्विकार केला.


  अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत...
  25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शिक्षण संस्थेत मोफत व सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला. 4 मार्च 1918 रोजी त्याची अंमलबजावणी केली. शाहू महाराज सत्तेवर आले तेव्हा 5 अस्पृश्यांसाठी 5 शाळा होत्या. त्यांनी त्यात वाढ केली. 1917 साली त्यांची संख्या 27 झाली. अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत दिली.


  अस्पृश्यांना मराठे व ब्राम्हणांची आडणावे...
  राजाराम हायस्कूल व कॉलेजमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. तसेच अस्पृश्य विद्यार्थांना 5 रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली. दरबारात नोकर म्हणून अस्पृश्यांना नोकर्या दिल्या. स्वत: शाहू महाराजांचे अंगरक्षक महार होते. जातीवाचक आडणावे बदलण्याचा उपक्रम हाती घेतला. अस्पृश्यांना मराठे व ब्राम्हणांची आडणावे दिली.


  कोल्हापूरचे भवानी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले...
  26 ऑगस्ट 1912 रोजी त्यांनी मागासलेल्या लोकांसाठी 50 टक्के जागा नोकरीत राखून ठेवण्याचे आदेश दिले. महार वतने कायद्याने 1818 साली बंद झाले. गंगाराम कांबळे या व्यक्तीस हॉटेल चालवण्यास आर्थिक मदत केली. शिक्षण, आरोग्य आणि इतर खात्यात अस्पृश्यता पाळू नये असा आदेश दिला. विटाळ मानने हे कायद्याने गुन्हा ठरवले. कोल्हापूरचे भवानी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. अस्पृश्य व स्पृश्य यांचीय सहभोजने घडवून आणली.

  केवळ विचारच मांडले नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीही केली
  शाहू महाराजांनी अस्पृश्यांविषयी केवळ विचारच मांडले नाहीत. तर प्रत्यक्ष कृतीही केली. या जातीतील लोकांना समानतेचा अधिकार मिळावा त्यांचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न केले. निरनिराळ्या परिषदातून सामाजिक सुधारणा विषयी आपले विचार मांडले.

  पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

 • Rajarshi Shahu Maharaj Birth Anniversary

  शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब) आणि आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

 • Rajarshi Shahu Maharaj Birth Anniversary

  चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक आणि सुधारणावादी होते.

Trending