आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकडं विंचू आहे, मला चावलेला आहे, तिथं कुणाचं काही खरं नाही; राजू शेट्टींचे भाजपला चिमटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्‍हापूर- 'अच्‍छे दिनाचा बुलबुला मलाही पटला होता. वाटल होत, शेतकरी, कष्‍टकरी, सर्वसामान्‍यांना चांगले दिवस येतील. म्‍हणून या अच्‍छे दिनाच्‍या शोधात गेलो. मात्र कसले आलेय अच्‍छे दिन', अशा शब्‍दांत खासदार राजू शेट्टी यांनी भाजपच्‍या अच्‍छे दिनाच्‍या आश्‍वासनाची खिल्‍ली उडवली. ते कोल्‍हापूरातील शाहू स्‍मारक भवनातील एका कार्यक्रमात बोलत होते.


तो विंचू मलाही चावलाय
कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज सध्‍या भाजपच्‍या संपर्कात असल्‍याची चर्चा आहे. याविषयी बोलताना राजू शेट्टींनी उपस्थितांना एक गोष्‍ट ऐकवली. 'लहान मुल खेळत असताना त्‍यातील एक जण मारुतीच्‍या मंदिरात जातो आणि मारूतीच्‍या बेंबीत बोट घालतो. त्‍यावेळी त्‍यामध्‍ये असलेला विंचू मुलाला चावतो. मात्र तो मुलगा हे कोणालाही सांगत नाही. याऊलट बेंबीमध्‍ये बोट घातल्‍याने फार गारगार वाटते असे खोटेच इतरांना सांगतो. त्‍यामुळे इतर मुलही एक एक करत मंदिरात जातात आणि मारुतीच्‍या बेंबीत बोट घालतात. सगळ्यांना विंचू चावतो. मात्र खर कोणीही सांगत नाही. याउलट सगळे गारगार वाटल्‍याच खोट सांगतात.'

 

ही गोष्‍ट ऐकवल्‍यानंतर राजू शेट्टी म्‍हणाले, 'मी मात्र खोट बोलणा-यांपैकी नाही. चंद्रकांतदादा म्हणतील ऋतुराजला इकडं तिकडं पाठवा, पण बंटीसाहेब (आमदार सतेज पाटील ) विंचू आहे तिकड. मला माहित आहे, तो मला चावलेला आहे. तिथं कुणाच काय खर नाही.' त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला.     

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, राजू शेट्टींच्‍या भाषणाचा व्हिडिओ...

 

 

बातम्या आणखी आहेत...