आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक लूटून चालकाचे अपहणर करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- सळीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे अपहरण करून ट्रकमधील 10 लाखांची लोखंडी सळीची चोरी करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पकडण्यात आलेल्या टोळीकडून 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र अद्याप या टोळीतील चौघेजण फरारी असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.


पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, 17 जानेवारीला बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथील प्रवीण भीमराव जाधव हे ट्रक आपल्या ट्रकमधून कागल एमआयडीसी मधून 22 टन बांधकामाची लोखंडी सळी घेऊन जात होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास रेंदाळ-बोरगाव मार्गावर काही चोरट्यांनी त्यांचा ट्रक अडवला आणि त्यांना कारमध्ये बसवून अज्ञातस्थळी नेले. तर, टोळीतील इतर साथीदारांनी ट्रक मधील सळी दुसऱ्या ट्रकमध्ये भरून चोरून नेली. या घटनेची फिर्याद जाधव यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली होती. 

 

संबंधीत घटनेचा तपास इचलकरंजी आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण सशाखेकडून सुरु होता. दरम्यान पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना संतोष बागडे आणि त्याच्या टोळी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. तसेच, ते सर्वजण करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे
 येणार असल्याचे त्यांना कळाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टोळी प्रमुख संतोष बागडे याच्यासह किरण बागडे, रियाज हैदर, दीपक सावंत, अभिजित संकपाळ आणि साजिद नाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच, ट्रकमधील सळी चोरीमध्ये आणखीन चौघे सामील असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सळी चोरी करून नेलेला ट्रक आणि २२ टन सळी आज कागल पंचतारांकित एमआयडीसी इथल्या एका गोडावून मधून जप्त करण्यात आली आहे.

 

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम, नामदेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल माळी, युवराज आठरे, कर्मचारी सुरेश चव्हाण, उत्तम सडोलीकर, अमित सर्जे, शहाजी पाटील, सुरेश राठोड, अजिंक्य घाटगे, प्रल्हाद देसाई, यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...