आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयाचा गलथानपणा... जिवंत रुग्णाला मृत घोषित केले, नातेवाईकांना सोपवला दुस-याचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली. जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे एक रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईंकाना चांगलात मनस्ताप सहन करावा लागला. एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करुन दुसयाचा मृत रुग्णाचा मृतदेह नातेवाईंकाना सोपवला. पण नातेवाईकांच्या तत्परतेमुळे रुग्णालयाचा गलथानपणा उघडकीस आला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाथ बागवडे यांना आजारी असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एवढेच नाहीतर त्यांच्या नातेवाईंकाना दुस-याच रुग्णाचा मृतदेह सोपवला. पण नातेवाईंकानी तत्परतेमुळे हा प्रकार उघड झाला. नातेवाईंकानी रुग्णालयाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला. बागवडे यांच्यावर उपचार सुरु असून नातेवाईकांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...