आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामटेच्या मामेसासऱ्याला अटक; त्यानेच लावली अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची विल्हेवाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- पोलिस दलाची खाकी मलिन करणार्‍या बहुचर्चित अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी मुख्य आरोपी आणि निलंबित पोलिस अधिकारी युवराच कामटे याच्या मामेसासर्‍याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी (सीआयडी) अटक केली आहे. बाळासाहेब कांबळे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला सीआयडीने कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी युवराज कामटे याला मदत केल्याचा दावा सीआयडीने केला आहे.

 

सांगली पोलिसांनी दिलेल्या थर्डडिग्रीमुळे अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. नंतर कामटे याने बाळासाहेब कांबळे याच्या मदतीने आंबोली घाटात अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आरोपींनी पालायन केल्याचा बनावही पोलिसांनी केला होता. या प्रकरणी युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली होती. या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत 12 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. बहुचर्चित अनिकेत कोथळे हत्येप्रकरणीशी संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...