आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड, भाजपचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर -जिल्हा परिषद आणि मनपाच्या सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार आज बिनाआवाजाच्या बॉम्बचीच वात काढून टाकत कोल्हापूरच्या  महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे या विजयी झाल्या तर उपमहापौर पदावर  राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांची वर्णी लागली.

 

आत्ता पर्यंत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीत       तटस्थ राहण्याचा निर्णय गुरुवारी रात्रीच घेतल्याने काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयामुळे महापौर पदाच्या निवडणुकीला अचानकपणे चांगलीच कलाटणी मिळाली.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजल्यापासून महापौर, उपमहापौर पदासाठीनिवडणूक प्रक्रिया सुरू झाली.मतदानात अपेक्षेप्रमाणे शोभा बोंद्रे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची 44 एकूण मते मिळाली. तर भाजप-ताराराणी आघाडीच्या  रूपाराणी संग्राम निकम यांना 33 मते मिळाली. शिवसेना मात्र आपल्या निर्णया प्रमाणे तटस्थ राहिली.

 

उपमहापौरपदाच्या निवडणुकी देखील राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांची वर्णी लागली. त्यांना आघाडीची सर्वच्या सर्व  44 मते मिळाली. तर भाजप-ताराराणीच्या कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. या निवडणूकीत  सेनेचे 4 नगरसेवक अनुपस्थित राहीले.

 

कोल्हापूर महानगरपालिकेत सद्याच्या स्थितीला असलेले पक्षीय बलाबल खालील प्रमाणे

काँग्रेस-राष्ट्रवादी - 44
भाजप-ताराराणी - 33
शिवसेना - 04

बातम्या आणखी आहेत...