आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसिलदाराला अडीच लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले, तलाठ्यासह महिला लिपिकसुद्धा ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कागलचे तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे याला खरेदी जमिनीचे सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तहसीलदार घाडगे याच्या बरोबरच सुळकूड येथील महिला तलाठी शमशाद दस्तगीर मुल्ला आणि एकोंडी येथील तलाठी मनोज आण्णासो भोजे या दोघांनाही या प्रकरणात सहभागी असल्याने ताब्यात घेण्यात आले आहे.

 

याबाबत कोल्हापूर एसीबी कडून प्राप्त माहिती अशी, तक्रारदार संजय धोंडीराम जगताप रा.कसबा सांगाव ता.कागल,यांच्या वडिलांनी सुळकूड ता.कागल येथील जमीन गट नंबर 443 मधील 76 आर जमीन 2012 साली खरेदी केली आहे. त्या जमिनीचे सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी जगताप यांनी सुळकूड तलाठी शमशाद मुल्ला यांचेकडे रीतसर अर्ज दिला होता. शमशाद मुल्ला यांनी हे काम करून देण्यासाठी स्वतः साठी एक लाख आणि कागल चे तहसीलदार किशोर घाडगे यांची बदली होणार असून त्याआधी हे काम करून देण्यास ते तयार असून त्यांना देण्यासाठी 2 लाख रुपये अशी एकूण 3 लाखाची रक्कम लाच म्हणून मागणी केली. तलाठी मुल्ला यांनी जगताप यांना आपल्या राहत्या घरी बोलावून पुन्हा लाचेची रक्कम मागितली. मात्र जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रीतसर तक्रार दाखल केली.

 

आज दुपारी यापैकी स्वतःसाठी मागितलेल्या 1 लाखातील 50 हजार आणि तहसीलदार घाडगे यांच्यासाठी 2 लाखाची रक्कम अशी एकूण 2 लाख 50 हजाराची रक्कम घेऊन तहसीलदार किशोर घाडगे यांची भेट घेण्यासाठी बोलावले.दरम्यान कागल तहसीलदार कार्यालयाच्या तळ मजल्यावर असलेल्या कँटीन मध्ये आधीच सापळा लावून दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार घाडगे यांच्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्विकारताना तलाठी मुल्ला हिला रंगेहात पकडले.तर स्वतःसाठी मागितलेल्या 1 लाखाच्या रकमेपैकी 50 हजाराची रक्कम स्वीकारून ती एकोंडी येथील तलाठी मनोज भोजे यांच्याकडे सोपवल्याने मनोज भोजे यालाही ताब्यात घेतले. तहसीलदार किशोर घाडगे,सुळकूड तलाठी शमशाद मुल्ला,आणि एकोंडी तलाठी मनोज भोजे या तिघांवर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच मनोज भोजे याच्याकडून लाचेची 25 हजाराची रक्कम जप्त करण्यात आली आहे. कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक गिरीष गोडे,पोनि मारुती पाटील,सहायक फौजदार शामसुंदर बुचडे,पोलीस नाईक आबासो गुंडणके व संदीप पावलेकर यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते

 

बातम्या आणखी आहेत...