Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | tanker fallen on pune satarara highway

पुणे-बंगलुरु महामार्गावर डिझेल टॅंकर उलटला, मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2018, 12:27 PM IST

पुण्याहून साता-याकडे निघाला होता. ड्रायवरचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर पलटी झाला.

  • tanker fallen on pune satarara highway

    सातारा- पुणे-बंगलुरु महामार्गावार पाचवड उडड्णा पुलाजवळ डिझेल टॅंकर पलटी झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली. डिझेलची वाहतूक करणारा टॅंकर (एमएच 06 बीपी 1355) पुण्याहून साता-याकडे निघाला होता. ड्रायवरचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर पलटी झाला. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहने रोखून ठेवण्यात आली होती. अपघातग्रस्त टॅंकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Trending