आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची गोळ्या झाडून हत्‍या केल्‍यानंतर पतीचीही आत्‍म‍हत्‍या; कोल्‍हापुरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पत्‍नीची गोळ्या झाडून हत्‍या केल्‍यानंतर पतीने आत्‍महत्‍या केल्‍याची घटना कोल्‍हापूर येथे घडली. बबन पांडुरंग बोबडे (६५) असे मृत पतीचे नाव आहे. मुळचे मुंबर्इचे असलेले बोबडे हे येथील विश्वकर्मा कॉम्प्लेक्समधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये भाड्याने रहात होते. सोमवारी दि. 30  रोजी दुपारी त्‍यांनी आपल्या पत्नीवर रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या, त्यानंतर रिव्हॉल्वर मधून स्वतः वर त्याच गोळी झाडून आत्महत्या केली. 


बबन बोबडे यांची दोन्ही मुले मुंबईत नोकरीस आहेत. गेल्या वर्षापासून पती - पत्नीचे कोल्हापुरात वास्तव्य होते. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर बोबडे यांच्या घरात तीन ते चार चिठ्ठ्या मिळाल्या असून त्यामध्ये मोलकरणीचे पैसे, पेपरवाल्याचे बिल, मुलांच्या मोबाईल नंबरचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. बबन बोबडे हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांकडून त्याला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...