आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 दिवसात पगारी पुजारी नेमा अन्यथा मंत्रालयाबाहेर गोंधळ घालू; पुजारी हटाव कृती समिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- करवीरनिवासींनी अंबाबाईच्या मंदिरात आगामी 15 दिवसात पगारी पुजारी नेमा अन्यथा मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालू असा सज्जड इशारा आज अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने दिला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत कृती समितीने निवेदनही दिले आहे.

 

 

साडेतीन शक्तीपीठा पैकी एक संपूर्ण शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांची मनमानी झाल्याचा आरोप करत गेल्या काही महिन्यांपासून मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात यावेत या मागणीसाठी मोठे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर येथील मंदिरांप्रमाणे कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात सुद्धा पगारी पुजारी नेमण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 20 जून 2017 रोजी कृती समिती सोबत झालेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र या त्यांच्या आश्वासनाकडे ही दुर्लक्ष करून कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचा आरोप आता कृती समितीने या निवेदनात केला आहे.सरकार अप्रत्यक्षपणे अंबाबाई मंदिरातील गैरकारभार करणाऱ्या पुजाऱ्याना पाठीशी घालत असल्याचा आरोपही या निवेदनात आहे.त्याचबरोबर आगामी 15 दिवसात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमले नाहीत तर मंत्रालयाच्या दारात आई अंबाबाई चा गोंधळ घातला जाईल असा इशारा या निवेदनात अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने दिला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...