आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वधु-वरांना गिफ्ट घ्यायला निघाले होते पाहुणे, लग्नमंडपासमोरच दोघांना टेम्पोने चिरडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील देवरेवाडी गावात उतारावरुन भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दोन लोकांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते दोघे लग्नसोहळा पार पडल्यानंतर वधु-वरांना गिफ्ट घेण्यासाठी बाहेर पडले होते. लग्नमंडपासमोरच ही दुर्दैवी घटना घडली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, ढेकोळी बु. येथील चाळोबा लक्ष्मण रेंबुळकर (वय ३९) व जोतिबा भरमू पवार (वय ४२) देवरेवाडी येथे रेंबुळकर व पवार जंगमहट्टी येथील नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. लग्नाच्या अक्षता पडल्यानंतर या दोघांनी वर्‍हाडी मंडळीं समवेत भोजन केले. वधु-वरांना भेट देण्यासाठी नजीकच स्त्यापलीकडे असणार्‍या एका स्टेशनरी दुकानात कागदी लखोटा खरेदी करण्यासाठी हे दोघे गेले होते. लखोटा खरेदी करून लग्न मंडपाकडे दुचाकीवरुन येत असताना उतारावरुन भरधाव वेगाने आलेल्या पेव्हरब्लॉकने भरलेल्या टेंम्पोने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही १० फुट फरफरटत गेले. धडक इतकी जोराची होती की, दोघांच्याही डोके व शरीराचा चेंदामेंदा झाला. या दुर्देवी घटनेने लग्नमंडपात शोककळा पसरली. 

बातम्या आणखी आहेत...