आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उदयनराजे संतापले, म्हणाले -पुन्हा \'राजेशाही\' आणा मग बलात्का-यांना दाखवतोच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- देशभरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे. नुकतीच कठुआ येथे चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. अशातच साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजेशाही असती तर बलात्का-यांना गोळ्या घालून मारण्याची सजा दिली असती असे विधान केले आहे. ते साता-यातील एका आंदोलनात बोलत होते. 

 

 जिल्हा परिषदेच्या समोर एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली म्हणाले, जनतेने निवडून दिलेले सदस्य, लोकप्रतिनिधी तुमचे प्रश्न मार्गी लावत नसतील तर काय उपयोग नाही. आज बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला अपवाद तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. लोकशाही नसती तर बलात्काऱ्याला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा, पुन्हा  'राजेशाही' आणा मग मी काय करायचे ते दाखतोच

बातम्या आणखी आहेत...