Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Up election candidate suicide in kolhapur

उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या पराभूत उमदेवाराची इचलकरंजीत आत्महत्या, खोलीत घेतला गळफास

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2018, 08:24 PM IST

गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून मडियाहू मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न

  • Up election candidate suicide in kolhapur

    कोल्हापूर- उत्तप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने इचलकरंजीतील एका घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. अरुणकुमार उमाशंकर उपाध्याय (वय 44, मुळ-भीमपूर ता बदलापूर, जिल जौनपूर. उत्तरप्रदेश) यांनी आत्महत्या केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणकुमार यांनी गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून मडियाहू मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. त्या दिवसापासून ते नैराश्यग्रस्त होते. इचलकरंजीत राहणा-या त्यांच्या नातेवाईकांनी अरुणकुमारांचा तणाव कमी व्हावा म्हणून 20 दिवसांपूर्वी आपल्याकडे आणले होते. त्यांचे नातेवाईक सांगली रोड परिसरात भाड्याच्या घरात राहतात.

    रविवारी रात्री उपाध्याय न जेवताच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी खोलीच्या फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना उठविण्यासाठी नातेवाईक गेले असता त्यांना उपाध्याय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले.अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत.

Trending