आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर- सांगलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रंगलेल्या ऐतिहासिक कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंगला आस्मान दाखवलं आहे. लोखंडी पिंजऱ्यातील या पोलादी कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली.
स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी महाराष्ट्रातील नागरिकांना पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यातल्या कुस्तीचा थरार अनुभवता आला. या कुस्तीला पाहुणे म्हणून भिडे गुरुजी उपस्थित होते. त्याच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. भिडे गुरुजी यांच्यासह किरण भगत आणि मनजीतसिंग या दोन्ही पैलवानांनी आखाड्यात उतरुन उपस्थितांना अभिवादन केले.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.