आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फलटणमध्ये युवती कॅनाॅलमध्ये वाहून गेली, दुपारपासून गावक-यांची शोधमोहिम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- फलटणमधील निंबळक गावात एक युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. तिचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. अद्याप तरी तिला शोधण्यात यश आलेले नाही. ही युवती आपल्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील रुई गावात राहणाही प्रियांका घोडके ही युवती आपला मामा विक्रम भोसले यांच्याकडे निंबळक येथे सुट्टीसाठी आली होती. सकाळी ती मामासोबत कॅनाॅलवर गेली होती. मामा कॅनाॅलमध्ये पोहत होता तर ती काठावर बसली होती. ती पाय धुवायला पाण्यात उतरली याचवेळी तिचा तोल गेला आणि ती मामा देखत पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली.  पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र प्रियंका मिळून आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...