आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर ब्लेडने हल्ला, तरुणानेही स्वत:चा गळा चिरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- एका 24 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणा-या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यानंतर स्वत: चा गळा कापून हाताची नस कापली आहे. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहचले असून दोघांनाही हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जतमधील मध्यवर्ती भागात सकाळी 10 वाजता ही घटना घडली. 

 

पीडित मुलगी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी कृष्णा जालिंदर पिसाळ (24) हा मुलीच्या जवळ आला आणि तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. त्याने यानंतर स्वत: गळा आणि हाताची नस कापून घेतली. दोघांनाही हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हा हल्ला एकतर्फी प्रेमातून केल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...