आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूने छातीवर सपासप वार करून कोल्हापुरात तरुणाची निर्घृण हत्या; आरोपी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- छातीवर चाकूने सपासप वार करून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. काल (बुधवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गांधी मैदानामध्ये ही घटना घडली. प्रणव उर्फ गणेश सुभाष बिंद (वय- 17, रा.खंडोबा तालिमीजवळ शिवाजीपेठ) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

 

दोन तरुण मंडळाच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा असून संपूर्ण शिवाजीपेठ परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक अनिल गुजर अधिक तपास करत आहेत.

 

बिंद कुटुंबीय मूळ गुजरातचे...

गणेश बिंद याचे कुटुंबीय मूळ गुजरातमधील आहे. गणेशचे वडील सुभाष बिंद हे 20 वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरात आहे. सुभाष बिंद हे खंडोबा तालमीच्या मागे पद्माराजे उद्यानाच्या परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. गणेशचे वडील काही वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलांना सोडून परगावी निघून गेले होते. त्यानंतर ते परत आले नाहीत.

 

खेळणी विकून आईने केले पालणपोषण...

गणेशची आई लहान मुलांची खेळणी, सौंदर्य प्रसाधने याची विक्री करून गणेशसह त्या भावंडाचे  पालनपोषण करत होती. दहावीनंतर शिक्षण थांबवून गणेश आईच्या कामात मदत करत होता. तर लहान भाऊ शाळेत जात होता. पती निघून गेल्यानंतर आईला गणेशचा मोठा आधार होता. आता हा आधारही निघून गेला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... काय आहे हे प्रकरण..?

बातम्या आणखी आहेत...