सांगलीत एकाचा घरात / सांगलीत एकाचा घरात घुसून राॅड डोक्यात घालून खून, हल्ल्यात आजी गंभीर जखमी

Apr 18,2018 02:00:00 PM IST

सांगली- शहरातील आपटा पोलीस चौकी समोरील एका अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. हल्लेखोरांच्या हल्ल्यात त्या व्यक्तीची आजी देखील गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला


आपटा चौकीसमोरील श्री अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर पारेख कुटुंबीय राहते. या कुटुंबातील टिलूभाई पारेख आणि त्यांची आजी राहत होती. मध्यरात्रीच्या अज्ञात हल्लेखोर टिलू पारेखच्या फ्लॅटमध्ये घुसले व त्यांची डोक्यात राॅड घालून हत्या केली. या झटापटीत त्यांची आजी देखील गंभीर जखमी झाली. ती रात्रभर त्याच अवस्थेत पडून होती. सकाळी ही घटना उजेडात येताच तिला रुग्णालयात भरती करण्यात आले तर टिलूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

X