आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश अांबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला- भिडे; मुंबईतील 26 मार्चचा माेर्चा राेखण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- काेरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी गुन्हा दाखल होऊन २ महिने गप्प असलेले शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साेमवारी माैन साेडले. ‘प्रकाश अांबेडकर व पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमुळे दंगल भडकली, नंतर महाराष्ट्रही पेटला,’ असा अाराेप करतानाच दंगल काळात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने का द्यावी, नुकसान करणाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करावी,’ अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.  


या दंगलप्रकरणी मिलिंद एकबाेटे व भिडे यांच्याविराेधात गुन्हे दाखल झाले अाहेत. एकबाेटे सध्या अटकेत अाहे.  भिडे म्हणाले, ‘पुण्यात झालेली एल्गार परिषदच काेरेगाव  भीमा येथील दंगलीस कारणीभूत आहे. प्रकाश अांबेडकर यांच्यासह आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केलेली वक्तव्ये दंगलीसाठी कारणीभूत ठरली अाहेत. अाधी त्यांना अटक करायला हवी.’ संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू गावात मी गेल्या चार- पाच वर्षात फिरकलाेही नाही. मात्र विनाकारण अामची नावे त्यात गाेवली जात अाहेत. हा प्रकार म्हणजे ‘चाेर साेडून संन्याशाला फाशी’ असाच अाहे.  राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी या दंगलीचा वापर केला जातोय. प्रकाश आंबेडकर यांनी भडक विधान केल्यानेच महाराष्ट्र पेटला,’ असा आरोपही भिडे यांनी केला.  

 

अांबेडकरांच्या मोर्चाला  परवानगी नको  
संभाजी भिडेंना अटक न झाल्यास २६ मार्च राेजी मुंबईत माेर्चा काढण्याचा इशारा भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश अांबेडकर यांनी दिला अाहे. या संदर्भात भिडे म्हणाले, ‘प्रकाश अांबेडकरांची ही मागणी म्हणजे नुसता खुळचटपणा अाहे. सरकारने त्यांच्या माेर्चाला परवानगी देऊ नये, अन्यथा राज्यात अाणखी नुकसान हाेण्याची शक्यता अाहे. तसेच काेरेगाव प्रकरणाची चाैकशी करावी, या मागणीसाठी अापण २८ मार्चला जिल्हास्तरीय माेर्चा काढणार अाहाेत,’ असा इशाराही भिडे यांनी दिला.

 

बातम्या आणखी आहेत...