आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगारी पुजारी नेमण्याबाबत एकमत झाले तरच लवकरच सरकार वटहुकुम काढेल- चंद्रकांत पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- अंबाबाई मंदिरात पुजारी हटाव लढा, आता अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारने त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवालही सरकार कडे सादर करण्यात आला आहे. त्या आह्वालात नेमके काय म्हणण्यात आले आहे.  त्याबाबत उद्या (मंगळवार) विधी व न्याय विभागाचे सचिव आणि आपण स्वतः बैठक घेणार आहोत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली.

 

ते म्हणाले, संपूर्ण व्यवस्थापन, 47 हजार एकर जमिनी आणि पुजारी असा कायदा करत असताना वेळ लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण स्वतः याबाबत विनंती केली आहे. तसेच विधी व न्याय विभागाला पुजाऱ्यांचे पगार,त्यांच्या नोकरीच्या अटी या विषयापुरता वेगळा कायदा करावा अशा सूचना दिल्या आहेत. याचा निर्णय उद्या मंगळवारी होईल असे ते म्हणाले.

 

अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव कृती समितीच्या आंदोलकांनी केलेल्या मागणीबाबत सरकारही ठाम आहे.अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातील एक एक रुपया पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या तिजोरीत जमा व्हायला हवे.आणि त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी पुजाऱ्यांना चांगले पगार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिले पाहिजेत. यासाठीचा कायदा अधिवेशनात आणेपर्यंत न थांबता उद्या परवा पर्यंत एकमत झाले तर सरकार त्याबद्दल वट हुकम काढेल असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आश्वासन देवूनही जर सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पुजारी हटाव संघर्ष समितीने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...