आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीशी वाद झाल्याने तीन मुलींसह महिलेची अात्महत्या, विहिरीत घेतली उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पतीसाेबत हाेणाऱ्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने अापल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वज्रचाैंडे या गावात साेमवारी सकाळी उघडकीस अाली. सुनीता सुभाष राठोड (३२), जुळ्या बहिणी आशा (४), उषा (४) व ऐश्वर्या (२) अशी मृतांची नावे अाहेत. मूळ कर्नाटकातील विजापूर तालुक्यातील रहिवासी असलेले राठाेड कुटुंबीय कामाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात तीन महिन्यांपासून स्थलांतरित झाले हाेते.   


रविवारी कामाला सुटी असल्याने राठोड कुटुंब घरीच होते. सुभाष राठाेड व सुनीता यांच्यात पैशाच्या कारणावरून नेहमीप्रमाणे वाद झाला. त्यानंतर कामासाठी सुभाष राठोड दुपारनंतर घराबाहेर गेला. भांडणाचा राग मनात धरून सुनीताने तीन मुलींना घेऊन घर साेडले. घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत तिने मुलींसह उडी घेऊन अात्महत्या केली. सायंकाळपर्यंत पत्नी व मुली घरी न आल्यामुळे सुभाषने त्यांची सर्वत्र शाेधाशाेध केली. एका  शेतकऱ्याला त्याच्या विहिरीजवळ चपला दिसल्या.

 

साेमवारी सकाळी पत्नीचा शाेध घेत असलेल्या सुभाषला याबाबत  माहिती कळाली.  त्याने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत उतरून शाेध घेतला असता पत्नी सुनीता व दाेन मुलींचे मृतदेह सापडले. तिसऱ्या मुलीचा शाेध घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू हाेते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच पती सुभाष याचाही जबाब घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...